लातूर येथे लवकरच सूपरस्पेशालिटी हॉस्पीटलची सुरुवात माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे स्वप्न पूर्णत्वास - राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर - राज्यातील महाविकास आघाडीचे शासन सर्व घटकांना मदत करणारे शासन आहे. राज्यातील इंडियन रेडिओलॉजिकल ॲन्ड  इमेजिंग असोसिएशनच्या संदर्भातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी  शासन व असोसिएशन मधील दुवा म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांनी केले.

      महाराष्ट्र स्टेट ब्रँच ऑफ इंडियन रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशन, लातूर यांच्या वतीने 43 व्या आयोजित वार्षीक परिसंवाद कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी त्यांनी केले.या कार्यक्रमास विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय दौंड, औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थानचे अधिष्ठता डॉ.गिरीष ठाकूर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.संजय ढगे, आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, डॉ.गिरीष मैंदरकर, डॉ.अजय जाधव उपस्थित होते.

या वार्षीक परिसंवाद कार्यक्रमास मार्गदर्शन करताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्व घटकांना मदत करणारे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अगदी सरळ आहेत विकासाच्या कामाकरिता ते सदैव तत्पर आहेत. मी सरकार व तुमच्या मधील दूवा म्हणून विकासाची कामे मार्गी लावणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


लातूर येथे लवकरच सूपरस्पेशालिटी हॉस्पीटलची सुरुवात होत असून माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे स्वप्न पूर्णत्वास होत आहे. त्याचे लोकार्पण लवकरच होणार आहे. असे नमुद करुन राज्यातील रेडिओलॉजिकल ॲन्ड  इमेजिंग असोसिएशनच्या संदर्भातील सर्व कामाच्या अडचणी राज्याचे   वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे बैठक आयोजित करुन दूर केल्या जातील असे अश्वासन दिले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.दिलीप लाखर,डॉ.सुरेश चांडक,डॉ. राजेंद्र शिवडे व डॉ.रमेश मलानी  यांना जिवन गौरव पुरस्कार तर डॉ.श्लोक लोलगे, डॉ.हेमंत पटेल व डॉ. दिपक पाटकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आमदार संजय दौंड,आमदार अभिमन्यू पवार, डॉ.गिरीष मैंदरकर, डॉ.संदीप कवठाळे यांची समयोचीत भाषणे झाली.

या कार्यक्रमात डॉ.संजय कवठाळे यांच्याकडे रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून सुत्रे देण्यात आली. कार्यक्रमास राज्यभरातून व राज्या बाहेरील प्रसिध्द डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन डॉ.गिरीष कोरे यांनी केले. प्रस्तावीक डॉ.प्रशांत ओंकार तर डॉ.अनिल घुगे यांनी मानले.

Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image