रत्नागिरी | जो शिवसैनिक नाणार रिफायनरीला समर्थन करेल त्याचं थोबाड फोडा, अशी ताकीद शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. नाणार विरोधातील जाहीर सभेत राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे.
अनेक शिवसेना पदाधिकारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ उघडउघड भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे विनायक राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. जो कोणी प्रकल्पाला विरोध करेल त्याला सक्त ताकीद दिली आहे.
विनायक राऊत यांच्यासोबत सभेला शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. त्यांनीही यावर भाष्य करत नाणार रिफायरीबाबत शिवसैनिकांनी सावध रहावं. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ देणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, नाणार प्रकरण चांगलंच पेटण्याची शक्यता आहे. कारण आज नाणार विरोधकांची सभा झाल्यानंतर सोमवारी नाणार समर्थकांची सभा होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.