मुंबई | शरद पवार यांनी आज फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कमेंट बॉक्समध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलीत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं नतं मांडली.
कोरोनामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे सरकारने त्यांचे 4 ते 5 वर्षाचे हप्ते सोडून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे.
कोरोनामुळे बळीराजाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट अशी झाली आहे. पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. शेतकऱ्यांना धान्य मोफत देत असताना त्यांच्या धान्याची खरेदी करण्याचा विचारही सरकारने करावा, अशीही मागणी पवारांनी यावेळी बोलताना केली.
दरम्यान, परिस्थिती बदलतेय लोक सहकार्य करतायत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अत्यावश्यक सेवेच्या गाडयांना अडवू नये, अशी सूचना शरद पवार यांनी यावेळी पोलिसांना केली.