मुंबई | चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त वाचल्यानंतर नेटकऱ्यांच्या आणि वाचकांच्या पोटात गोळा आला आहे. चीनमधल्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे. कोरोनाने हजारो जणांचे प्राण घेतले आहेत. आणखी हे संकट जात नाही तोवरच चीनमधून दुसरी धक्कादायक बातमी आली आहे. चीनमधल्या यूनाना प्रांतातून एका व्यक्तीचा हंता विषाणूने मृत्यू झाला आहे.
हंता विषाणू हा करोनाइतका घातक विषाणू नाहीय. करोनानुसार हा संसर्गाने पसरत नाही. उंदीर किंवा खारीच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. कोरोनाप्राणे हंता विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून एखाद्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्यास त्याला हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो. एखाद्या व्यक्तीला हंताचा संसर्ग झाल्यास ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, अतीसार ही हंताची प्रमुख लक्षणे आहेत.