राज्यातील कोरोना ग्रस्त 225 वरून 302 वर ; रुग्ण संख्येत धक्कादायक वाढ

आपली काळजी वाढविणारी बातमी आत्ताच समोर आली आहे. आज एकाच दिवसात महाराष्ट्रात तब्बल 77 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत . यातील 59 लोक हे मुंबईचे आहेत तर इतर ठाणे ,पुणे ,अहमदनगर ,वाशी या भागातील आढळून आले आहेत. कालपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 225 होती, तीच आज संध्याकाळपर्यंत 77 ने वाढवून 302 इतकी झाली आहे. तर देशातील रुग्ण  1150 इतके झाले आहेत.



आज नव्याने सापडलेले कोरोनाग्रस्त हे मुंबईतील चाळ , झोपडपट्टी अशा भागात राहणारे आहेत . यातील सर्वात काळजी करण्याची गोष्ट म्हणजे यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तरुणांची  रोग प्रतिकारकक्षमता अधिक असली तरीही समोर आलेल्या वृत्तानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तरुण नागरिकांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे . त्यामुळे तरुणांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे .


आता राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातून प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे . तसेच कोरोना रुग्णांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे .


सावधान रहा ; काळजी घ्या.


Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image