लातुर: दर वर्षाप्रमाने स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने आज गंजगोलाइत सर्वांसाठी पानिपोई सुरु करण्यात आली या पांपोईचे उद्घाटन प्रवासी वृद्ध महिला सुदामतीबाई बुलबुले रा.सामानगाव यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी प्रमुख उपस्थिति संघटनेचे संस्थाप अध्यक्ष मोहसिन खान,एन. ए. इनामदार,एड.पंचाक्षरी,जावेद मनियार,राजू रेड्डी,सुजाउद्दीन आफताब होते.गोलाइत एक वृद्ध महिला रसत्याने जात असताना पाहुन एन वेळी या वृद्ध प्रवासी महिलेस या पानिपोईचे उद्घाटक बनविन्यात आले, गेल्या 10 वर्षापासून स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने गंजगोलाई येथे उन्हाची तीव्रता जाणून पानिपोई सुरु केली जाते,या पानपोईत ठंड पाण्याची सुविधा असते,गंजगोलाई हा शहरातील व्यावसायिक राजधानी मानली जाते,म्हणून येथे पानिपोईचा उपक्रम राबविला जातो.
या पांपोइच्या साठी जिल्हाध्यक्ष शादुल शेख,जब्बार बागवान,टीपू सुल्तान ब्रिगेडचे शहराध्यक्ष फिरोज शेख,तोहिद मुजावर,अनवर शेख,शाहरुख शेख,सुमित दीक्षित,खाजा तंबोली, आयूब शेख,सत्तार शेख आदिंनी परिश्रम घेतले.