दिलासादायक बातमी! पुण्यामध्ये ४८ तासांत एकही नवा रुग्ण नाही, गेल्या २४ तासांत ५ रुग्ण कोरोनामुक्त.

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या नायडू रुग्णालयात आणखी तिघांची प्रकृती सुधारली असून त्यांनादेखील डिस्चार्ज देण्यात आला आहे.


या रुग्णांना डिस्चार्ज देण्याअगोदर एका दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे नायडू रुग्णालयातून आज पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


तीनही रुग्ण पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याच्या सहवासातील आहेत. एक या दाम्पत्याची मुलगी, दुसरा या दाम्पत्याच्या टॅक्सीचा चालक आणि तिसरा यांचा सहप्रवासी आहे.


दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 606 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 122 रुग्ण आहेत.



Popular posts
'शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो'
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल - शरद पवार यांची टिका
Image
दयानंद कला महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम ‘‘बी. ए. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना ऑनलाईन निरोप समारंभ’’
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image