आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत 1500 कोटी.

मुंबई |  कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत. आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांनी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. आधी 500 कोटींची मदत त्यांनी जाहीर केली होती. मात्र आता आणखी 1 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. रतन टाटांनी आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे.


कोरोना आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत टाटा ग्रुपने आणखी 1 हजार कोटी रूपये मदत म्हणून देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.



आता काळाची गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच वेळ असल्याचं टाटा यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय क्षेत्रांतील महत्त्वाच्या खरेदी यांसाठी टाटा ग्रुपकडून ही मदत दिली गेली आहे. काही तासांपूर्वी त्यासाठी रतन टाटांनी 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. मात्र आता त्यांनी आणखी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.


दरम्यान, साई मंदिराने 50 कोटी रूपये, मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराने 50 कोटी रूपये तर अंबाबाई मंदिराने देखील 2 कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा  केली आहे. दुसरीकडे अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आपापल्या परीने अनेक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान देत आहेत.


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image