आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलावर्गांबद्लच्या विशेष बाबिंना प्रकाश झोतात आणून त्यांच्याबद्दलची सामाजीक बांधीलकी आणि आस्था जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील सर्व स्तरातून केला जातो. त्याच अनुषंगाने आज लातूर येथील प्रसिध्द व्यावसायिक हरिश्चंद्र तापडीया यांच्या तिन कन्यारत्नांबाबतचा असलेला एक नैसर्गिक जन्मतिथीचा योगायोग येथे उलगडण्याचा प्रयत्न केला गेलाय.
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एकविसाव्या शतकातील स्त्री ही अबला नसून सबला झालेली आहे. आणि हे आपण अनेक ठिकाणी अनुभवलेले आहे. क्षेत्र कुठलेही असो अगदी मग ते राजकारण की समाजकारण, वैद्यकीय क्षेत्र असो की, अवकाशात भरारी घेणारे वैज्ञानिक संशोधन करणारे क्षेत्र. इतिहासात सुध्दा राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आदींनी आपल्या स्त्रीत्वाला झुगारुन अनेक ऐतिहासिक कामगिरी केलेल्या आहेत. या क्षेत्रातील आजपर्यंतच्या पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत सगळीकडे बरोबरी आज महिलांनी बरोबरी साधलेली आहे. तर अशाच या विज्ञान युगात चमत्कार, आश्चर्य आणि योगायोग या गोष्टींना दुय्यम स्थान दिले जाते. परंतू लातूरच्या तापडीया परिवारातील या तिन सख्या बहिणींचा चमत्कारी योगायोगच म्हणावा लागेल. लातूर येथील व्यावसायिक तापडीया यांच्या परिवारतील या तिन भगिनींच्या हा योगायोग म्हणजे या तिनही भगिनी जागतिक महिला दिनी म्हणजे 8 मार्च ला जन्माला आलेल्या आहेत. अगदी ज्याकाळात म्हणजे 70-90 च्या दशकात आपल्याकडे बर्याच असे जागतिक किंवा देशातील विशेष दिवस साजरे करण्याची प्रथा नसावी अशा काळातील हा योगायोग आहे. त्याशिवाय या कालखंडात मुलांच्या जन्मा विषयीच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये फार काही बदलही घडलेले नव्हते, की ज्यामुळे या तिन्हीं भगिनींचा जन्म वैज्ञानिक आविष्कारातून एकाच तारखेला घडवून आणला गेला असावा अशीही शक्यता नव्हती. या तिन्ही बहिणींपैकी पहिल्या भगिनी सुजाता माधवदास बाहेती यांचा जन्म 8 मार्च 1968, दुसर्या अर्चना किशोरजी राठी यांचा 8 मार्च 1972 आणि तृतीय कन्या श्रध्दा शैलेश सोनी यांची जन्म तारीख 8 मार्च 1982 अशी आहे.
महिला दिनी सर्व जगातून महिलांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्याबद्दल असलेली सामाजिक बांधीलकी आणि मानवाच्या अस्तित्वातील गरज समजून सांगण्यासाठी प्राधान्याने हा दिवस साजरी करण्याची संकल्पना वैश्विकस्तरावर मांडण्यात आलेली असावी. स्त्री ही आपली आई, बहिण, पत्नी आणि मुलगी अशी अनेक जिव्हाळ्याची नाती जोपासून घराला घरपण देते अशा स्त्रीचा आपण समाजातील पुरुषी वर्चस्वाचा अहंकार न जोपासता त्यांनाही सन्मानाची वागणूक द्यावी हा जागतिक महिला दिन साजरा करण्या मागचा उद्देश असतो.
8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी येणारा या तिन्ही भगिनींचा वाढदिवस बाहेती, राठी, सोनी आणि तापडीया परिवारांचे ऋणानुबंध मजबूत करून त्यांच्या अखंडतेला चालना देणारा जसा ठरतोय तसाच तो सर्व महिलांना सबलतेचा संदेश देणारा ठरतोय. या तीनही भगिनींनी त्यांच्या आपापल्या परिवारात त्यांच्या पतिला, कुटूंबाला त्यांच्या व्यावसायिक आणि पारिवारिक जीवनात आजपर्यंत आणि यापुढेही मोलाची साथ देऊन ज्याप्रमाणे एक आदर्श परिवार, आदर्श व सक्षम समाज निर्माण करण्याचे कार्य केले आहे, तसेच समाजाने सुद्धा मुलगी ही दोन्ही घरचा दिवा उजळणारी कुटूंबाचा अविभाज्य घटक समजून तिच्या जन्माचे सन्मानाने स्वागत करावे. त्याशिवाय सर्व महिलांना समाजात सन्मानाची वागणूक द्यावी असा संदेश या तिन्ही बहिणींच्या जन्मतिथीचा योगायोग समाज माध्यमांमध्ये उघड करणारे योग अभ्यासक व प्रशिक्षक दिपक गटागट यांनी दिला आहे.
हरिश्चंद्र तापडीया : - 94208 70769