लातूर : लातूर जिल्हयातील खरीप हंगाम २०१९चा पीकविमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झाला असून त्याची रक्कम ७०९ कोटी ८० लाख रुपये इतकी आहे . यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्या लांबल्या व परतीच्या पावसाने हाती आलेले पीक नुकसानीत गेले . त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता . खासदार सुधाकर श्रृंगारे , तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर , जिल्हाधिकारी जी . श्रीकांत व तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर यांनीही बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली होती . पीकविमा मंजूर झाल्याने शेतकरी थोडासा सुखावला आहे. जिल्हा बँकेकडे याद्या करण्याचे काम सुरू होईल व पैसे आल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत
लातूर जिल्ह्यास खरीप हंगाम २०१९ चा पिकविमा ७०९ कोटी ८० लाख रुपये, तो खालील प्रमाणे.
१) लातूर तालुका - १२५ कोटी ४५ लाख
२) रेणापूर तालुका - १११ कोटी ८८ लाख
३) अहमदपूर तालुका - ६७ कोटी
४) चाकूर तालुका - ७५ कोटी
५) उदगीर तालुका - ६३ कोटी ६७ लाख
६) देवणी तालुका - ३३ कोटी
७) जळकोट तालुका - २५ कोटी ४४ लाख
८) निलंगा तालुका - ८७ कोटी ७८ लाख
९) शिरूर अनंतपाळ तालुका - २८ कोटी २१ लाख
१०) औसा तालुका - ९२ कोटी ५३ लाख .