कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास त्यातून त्या गोष्टीचा उपभोग घेणारा लोप पावतो हि निती आहे. सध्या असाच प्रकार मोबाईल आणि मोबाईलवर असणारी माध्यमे यांच्या बाबतीत दिसून येतेय. पबजी वा अन्य गेम किंवा अति व्हॉटसऍप, फेसबुक वापराने व्यसनाधिन झालेल्या शिक्षीत व्यक्तींच्या बाबतीत आजकाल ह्या गोष्ट मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींची मोबाईल किंवा त्याच्याशी निगडीत व्यसनाधीनतेपासून सूटका करुन सर्व समावेशक जीवन प्रदान करायचे असेल तर त्याचे समूपदेशन गरजेचेच आहे असे यातून स्पष्ट केले आहे. याच विषयावर लातूरच्या मानसोपचार तज्ज्ञ ऍड. रजनी गिरवलकर यांच्याशी झालेल्या सखोल संवादातून एक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे कधी काळी आपल्या समाजात अनेक हुंडाबळी, नरबळीसारख्या अनेक विकृतींचे शिक्षणातून शहाने झालेल्यांनी हनन केले असले तरी याच शिक्षीत पिढीमुळे अतिमोबाईल वापरातून मोबाईल ऍडीक्टीशन हा नवा रोग अस्तित्वात आल्याची भितीदायक बाब त्यांनी स्पष्ट करुन दाखवली.
माणसाच्या भौतिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या समाज माध्यमांचे सध्या प्रागतिक फायदे जरी दिसत असले तरी त्याचे अनेक दुष्परिणामही सध्या समाजात अनुभवायला मिळत आहेत. संगणका बरोबरच बोकाळत चाललेली अतिमोबाईल वापराची वृत्ती अगदी मनाला सुन्न करायला लावणार्या घटना दर्शतवीत आहे. प्रसार माध्यमांवर दररोज वाचायला आणि पहायला मिळत असलेल्या घटना ह्या मनाला चटका लावणार्या आहेत. काल परवा वृत्तपत्रात वाचण्यात आलेली बेळगावची घटना, खरोखरच विदारक आणि मानव जातीला लाजवणारी होती. काय तर म्हणे पबजी गेम खेळण्यास वडिलांनी विरोध केला म्हणून मुलाने वडीलांचे चक्क तिन तुकडेच केले. यामुळे असे वाटते की अतिशय कमी वेळात आणि मोक्काट पसरलेल्या या माध्यमांच्या विदारकतेला माणसिक समूपदेशनाची खुप गरज असल्याचे जाणवत आहे.
माणसाच्या भौतिक प्रगतीत दिवसें दिवस अमुलाग्र बदल होत गेले. यामध्ये संपर्क क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बदल होत गेले. कधी काळी संवाद साधण्याची माध्यमे अनादी काळापासून केवळ पत्रच असायची. पण त्यात उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि पत्रांची जागा टेलीग्रामने घेतली, यामुळे एकमेकांचे लिखीत स्वरुपात जलद गतीने संपर्क व्हायला लागले. त्यानंतर टेलीफोन आले यामुळे जगातील कुठल्याही कानाकोपर्यातून माणसांचा संवाद होऊ लागला. पुढे - पुढे टेलीफोनच्या जोडीला अक्षरांच्या माध्यमातून संदेश वहन करणारे आणि प्रत्यक्ष संवाद साधता येणारे साधन म्हणून मोबाईल अस्तित्वात आला. परंतू याच मोबाईल मध्ये वाढत गेलेल्या सुविधा ह्या माणसाला फायद्याच्या कमी पण हानीकारक अधिक ठरु लागल्या. यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोणातून आरोग्याला आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचविणार्या ठरु लागल्या.
जसे की या मोबाईलमध्ये आलेल्या करमणूकीसाठीच्या व्हीडीओ आणि गेमींगच्या सुविधा यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करणारे तर ठरुच लागले पण यातून माणसाचा पैसा, वेळ आणि आरोग्य याची ही हानी दिवसें - दिवस वाढतच चालली. एकीकडे प्रगतिच्या शिखरावर असलेल्या माणसाला या मोबाईलचा अभिमान वाटावी अशी बाब दिसू लागली पण याच मोबाईलमुळे समोर येऊ लागलेल्या सामाजिक विघटनाच्या आणि मनोविकृतीच्या घटना ह्या माणूसकी शून्य जाणवू लागल्या आहेत.
ठिकाण कोणते ही असो माणसाला मोबाईल सोडवतच नाही. त्यामुळे मोबाईलच्या रेंजसाठी वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानातील रेडीएशन्समुळे पर्यावरणावर आणि अप्रत्यक्षरित्या मनुष्य जीवनावर होणार्या परिणामांकडे आपसूकच दूर्लक्ष होऊ लागलेले आहे. मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धात्मक चढाओढीमुळे मोबाईल टॉवरची संख्या दिवसें दिवस वाढतच चाललेली आहे. यामुळे वातावरणात असणारे पक्षीवर्गीय अनेक जीव आजघडीला नामशेष होत चालले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिमणी नावाचा पक्षी आपण आपल्या लहानपणी खुप जवळून पाहायचो पण आज ही चिमणी दिसतच नाहीये. ही एक प्रजातिक र्हासाची बाब आहेच पण तिच्या नामशेष होण्याचे दुःख ज्या माणसांना होत नाही त्याच माणसांना त्यांच्यातील ही कोणीतरी आपल्या विकृतींमुळे किंवा बेताल वागण्यामुळे जातोय याची देखिल खंत होत नाही ही बाब खुप गंभीर आहे.
एकूणच या मोबाईल आणि माध्यमांच्या अतिरेकामुळे बोकाळलेल्या विकृतींना आळा तर घालने शक्यच नाही पण त्याचे प्रमाण कमी करावयाचे असेल तर अशा विकृतींनी ग्रासलेल्या किंवा मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या लोकांचे समूपदेशन करुनच त्यांना माणसात आणन शक्य असल्याचे सांगणे क्रमप्राप्त ठरणार आहे. माध्यमांमध्ये वाढत चाललेला फेसबुक, व्हॉटसऍप, ट्वीटर, इन्स्ट्राग्राम आणि अन्य माध्यमांचा अतिवापर हा माणसाच्या माणसिकतेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण करत आहे. एकतर मोबाईल डिस्प्ले लाईटमुळे प्रत्यक्ष किरणांच्या डोळयावर होणारा परिणाम हा दिवसें दिवस माणसाची दृष्टी कमकुवत करत आहे, त्याउपर या माध्यमांमधून येणार्या समाजविघातक आणि प्रक्षोभक घटनांमधून माणसाचे माणसिक संतूलन बिघडत चालले आहे. दुसरीकडे मोबाईलमध्ये असणार्या गेम आणि त्याचा अतिवापर केल्याने मुला/मुलींच्या मनावर, अभ्यासावर आणि दिनक्रमावर परिणाम होऊन त्यांची कौटूंबिक हानी होत ही बाब सरकारने मनावर घेतलेली असतील तरी त्याचा वापर करणार्या व्यक्तींचे जोपर्यंत समूपदेशन होणार नाही तोपर्यंत यात बदल शक्य नाहीत.
आज देशात एकूण लोकसंख्येच्या किमान ७०% लोक हे मोबाईल म्हणजे स्मार्ट फोनचा उपयोग करत आहेत. यामध्ये जवळपास ४०-४५% उपभोक्ते हे युवावस्थेतील आहेत. म्हणजे ज्यांच्या खांद्यावर देशाच्या भविष्याची कमान आहे असे लोक. हिच मंडळी अशा प्रकारे मोबाईल आणि त्यात असणार्या ऍप्लीकेशनच्या आहारी जाऊन व्यसनाधिन झाल्यासारखी ग्रासलेली आहे त्यांच्याकडून कोणत्या चांगल्या भवितव्याची अपेक्षा करता येईल ही चिंतनीय बाब आहे.
एकीकडे भारत देश जागतिक स्तरावर महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत आहे तर दुसरीकडे अशा घटनांचा ओहापोह जेंव्हा प्रसार माध्यमांतून पहायला मिळतो तेंव्हा देशाच्या महासत्ता होण्याचे दिवास्वप्नचे होते की काय अशी चिंता वाटायला लागते. एकूणच अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने प्रत्येक विद्यापिठातील मानसोपचार विभागातील मनुष्यबळ वाढवून त्यांच्याकरवी क्रमिक अभ्यासक्रमात सुध्दा मानसोपचाराचे धडे देणे अनिवार्य करावे लागते की अशी भिती वाटणे वावगे ठरणार नाही. लातूर शहरातील मानसोपचार तज्ज्ञ आणि व्यवसायाने वकिल असणार्या पण महिलां सबलीकरणाबरोबरच सामाजिक कार्य करणार्या ऍड. रजनी गिरवलकर यांच्याशी झालेल्या संवादातून एक बाब प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे कधी काळी आपल्या समाजात अनेक दुरापास्त असलेल्या हुंडाबळी, नरबळीसारख्या अनेक विकृतींचे सध्याच्या शैक्षणिक पिढीमुळे हनन झालेले असले तरी याच शिक्षीत पिढीमुळे अतिमोबाईल वापराचा नवा रोग अस्तित्वात आल्याची भितीदायक बाब त्यांनी स्पष्ट करुन दाखवली. यातून यापुढील पिढींना वाचवायचे असेल तर प्रत्येक शहरात रुग्णालयाशी संलग्न एक समुपदेशन केंद्र निर्माण करुन समाजातील मोबाईल व त्यातून ग्रासलेल्यांचे समूपदेशन करणारे केंद्र निर्माण करावे अशी अपेक्षा करायला हरकत नाही.