मृतकाचे व्हावे पातक शिथील दवाखान्यात देय्य नसावे अंतिम बिल...

वैद्यकीय शास्त्राच्या नव-नविन प्रयोग होऊन मनोकल्याणाच्या अनेक संकल्पना अस्तित्वात आल्या. या संकल्पनेला प्रतिसाद देत सर्व सामान्य नागरिकांनी मोठ्या उदात्त भावनेने प्रतिसाद ही दिला. याचा अनेकांना लाभही झाला. मृत्यूच्या दाढेतील बाहेर आले आणि मृतकांनीही आपल्या जाण्याचे सार्थक केले. देहदान असो की, अवयव दान यातून अनेकांना जीवनदान मिळाले हे मात्र खरे. अशा अनेक चांगल्या संकल्पना अस्तित्वात आल्या त्या केवळ पृथ्विवर आपल्या वैद्यकिय ज्ञानाच्या जोरावर देवत्व प्राप्त केलेल्या या डॉक्टरांमुळेच. म्हणून आता त्याच देवांनी आता मृतकाचे पातक करावे शिथील, दवाखान्यात देय्य नसावे अंतिम बिल ही अपेक्षा करावीशी वाटते. यामुळे परिवारातील एक अविभाज्य घटक गमावलेल्या त्या कुटूंबाला माणसिक आणि आर्थिक स्थैर्य लाभेल हे मात्र हात जोडून सांगावेसे वाटते.


 



मनुष्य जन्मातला सर्वात कठिण आणि भोगलेल्या आयुष्याच्या मोजमापाचा काळच म्हणावा लागेल. आयुष्यभर केलेल्या पाप-पुण्याच्या कळा सोसण्याचा आणि त्याच्या परतफेडीचा हा काळ असतो. उतारवयात माणसाला अनंत वेदना आणि शारिरीक व्याधी येतात यामुळेच सध्याची विज्ञान युगात प्रगत होत चाललेली पिढी या वर्गाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याचे जाणवते. यामुळे दिवसें-दिवस शहरी असो की, ग्रामीण भागांत वृध्दाश्रमांचेही प्रमाण वाढत चाललेले आहे आणि अशातच शरिराने साथ सोडली की, त्यांच्या  होणार्‍या अवहेलना समाजातील प्रत्येक घटक जबाबदार असतो. त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की, मृतकाचे म्हणजे मृत्यूच्या शय्येवर असलेल्या देहाची विटंबना, विवंचना न करता त्याच्या पातकाला शिथील करुन प्रस्तापित व्यवस्थेने माणूसकी जिवंत ठेवण्यासाठी काही सोशिक उपाय योजना आणाव्यात अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 
थोडक्यात असेच म्हणता येईल की कोणत्याही दवाखान्यात, सरकारी असो अथवा खाजगी रुग्णालयात मरण पावणार्‍या व्यक्तीच्या उत्तरीय क्रिये शिवाय त्याच्या कुटूंबियांकडून इतर कसल्याही प्रकारचे बिल घेतले जाऊ नये असे विधेयक सरकारने पारित करावे किंवा वैद्यकिय व्यवस्थेने आपसांत असे माणूसकी जपणारी परंपरा आमलात आणावी ही अपेक्षा करणे एक मानवी संवेदना म्हणून प्रचलित करणे क्रमप्राप्त असेल.
मानवी मनाच्या या संवेदनेचे काही तोटेही असतील आणि तसेच लाभही. काही तरी चांगलं करत असताना अशा लाभ-तोट्यांचा विषय मुळीच राहत नाही. असे असले तरी लाभधारकारने एक माणूसकी म्हणून याचा गैरफायदाही घेऊ नये आणि व्यवस्थेनेही. चॅरिटी तत्वावर चालणारी रुग्णालये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेरक ठरतील. रुग्ण सेवा हा व्यवहारीक विषय जरी असला तरी वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी अन्य बाबींमधून जोमाने कमाई करत असताना मृतकाच्या, मृत्यूच्या दाढेतील व्यक्तीला म्हणजे मृत्यूशी हार पत्करलेल्यांना काही प्रमाणात शिथीलता द्यावी. मग बिलात असेल किंवा अन्य व्यावहारीक बाबतीत शिथीलता देऊन त्याच्या मागे राहिलेल्यांना पारिवारक, माणसिक आणि आर्थिक अस्थिरतेला थोड्या फार प्रमाणात सोशिक करता येईल असे वाटते.
या संकल्पनेचे लाभ व तोटे सांगताना असे म्हणता येईल की, दवाखान्यात आलेला प्रत्येक रुग्ण हा अतिशय चांगल्या पध्दतीने हाताळला जाईल. दवाखान्यात येण्याची रोग्याची अपेक्षा अगदी रास्तपणे पार पाडत प्रत्येक पेशंटला सर्वार्थाने दर्जेदार सेवा सुश्रूषा आरोग्य सेवकांकडून दिली जाईल यात शंकाच नाही. त्याला अखेरच्या स्थरापर्यंत अनंत परीश्रमातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मग असा प्रश्‍न निर्माण होतो की विद्यमान व्यवस्थेत हा प्रयत्न होत नाही का? तर तो होतो पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावहारिकता असते, आणि ती असुन सुध्दा त्याला तात्काळ बरे करण्यापेक्षा त्याला अनेक आवश्यक / अनावश्यक चाचण्या, परीक्षणे आणि तपासण्यांच्या कसरती कराव्या लागतात. यामुळे अशा सापेक्ष सेवेमुळे दवाखाना किंवा वैद्यकिय क्षेत्रात चाललेली सध्याची लॉबिंक/माफियेगिरी बंद होऊन पारदर्शक कारभारास सुरूवात व्हायला विलंब लागणार नाही. 
आज घडील या वैद्यकिय क्षेत्रातील प्रत्येक घटक हा आपल्या रुग्णसेवेचे पावित्र्य जपण्यासाठी आणि ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठीच तन, मन, धनाने या क्षेत्रात उतरलेला असतो. पण होतं काय तर.., व्यावहारीक होताना मात्र कधी माया, मोहजालाची त्याला लागन होऊन त्याच्यातील माणूसकी जपणारा माणूस लोप पावलेला कळतच नाही. असे असताना विद्यमान व्यवस्थेत ही मंडळी मड्याच्या टाळूवरचं लोणी काढणारी जमात बनत चाललीय असं काही जणांकडून सुध्दा बोललं जातं... त्यांच वाटणं ही वावग नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी एका हिंदी चित्रपटातून सुध्दा ही वास्तविकता दाखवण्यात आलेली होती. पण त्या वास्तविकतेतून वैद्यकिय क्षेत्राला पांढरपेशी लुटारु म्हणून निर्माण झालेली ओळख आणि नाईलाजास्तव यांला पर्याय नसल्याने एका घृणास्पद वास्तवास भारतीय नागरिक तोंड द्यायला लागलेत ही सुध्दा वास्तवाची दुसरी बाजू आहे. दुसरीकडे विदेशात वैद्यकीय सेवा एक पूण्यकर्म समजून तिथे या क्षेत्रात अतिशय पारदर्शकतेचे पालन पोषण करणारी मंडळी सुध्दा अनुभायला येतेय. विदेशात सेवा करुन आलेल्या एका भारतीय डॉक्टरला भारतातील आलेल्या कटू अनुभवाचे अनेकजण पाढे वाचत आहेत पण हेच पाढे आपल्याकडे गिरवण्याचे धाडस मात्र कोणी करत नाही ही सुध्दा खंतच म्हणावी लागेल.
रुग्ण सेवेशी निगडीत असलेल्या अनेक सेवा व सुविधा या सुध्दा सध्या लाजिरवाण्या झालेल्या आहेत. हे सर्व पाहत असताना पोटतिडकीने जी बाब सांगाविशी वाटते ती मी वर मांडलेली आहेच. तरी पण एखादा पेशंट वाचवण्याचा जेंव्हा तांत्रिक पध्दतीने सर्व प्रयत्न विफल होतात तेंव्हा ज्या विधात्यावर विश्‍वास ठेवून आपण रुग्ण सेवा देता तेंव्हा त्याच विधात्याला साक्षी माणून आपण एक प्रयत्न करावा. तो असा की, रुग्णाच्या शेवटात आपल्या बिलाची सर्वात मोठी जाचक वाटणारी देय्य रक्कम म्हणजे अंतिम बिल ते देय्य नसावे ही अपेक्षा. अन्य अनेक कटू वास्तव सांगत असताना अशा विचित्र रुग्ण सेवेतील बरबटलेल्या पातकाचे हनन करुन पुण्यकर्माकडे नेण्याचा हा प्रयत्न असेल हेच सिध्द करावे वाटतेय.
त्यातच मागच्या काळात वैद्यकिय क्षेत्राला स्वाभिमान वाटावा आणि नाविन्यपूर्ण अशा अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. मग त्यात अवयव दानाची संकल्पना असेल किंवा अवयव प्रत्यारोपणाचा विषय असेल यात वैद्यकिय क्षेत्राच्या ऐतिहासिक यशाचे उदाहरण जगाला नवजीवनाची एक आशादायी कल्पना देऊन गेले. या वैद्यक शास्त्राच्या या नव संकल्पनेला प्रतिसाद देत सर्व सामान्य नागरिकांनी याला मोठ्या उदात्त भावनेने प्रतिसाद ही दिला. यात अनेकांनी आपले मरणोत्तर किंवा मरणोपरांत देहदान असेल किंवा अवयव दान असतील अशा अनेक चांगल्या संकल्पना अस्तित्वात आल्या त्या केवळ पृथ्विवर आपल्या वैद्यकिय ज्ञानाच्या जोरावर देवत्व प्राप्त केलेल्या या डॉक्टरांमुळेच.  त्यामुळं मानवाच्या धर्तीवरील या देवाकडून हे पुण्यकर्म अशी अपेक्षा आहे.

   -संतोष स्वामी...


Popular posts
घरातून अपहरण झालेल्या त्या बाळाचा अखेर मृतदेह सापडला ।। हाथरस पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही! ।। आज लातूर जिल्ह्यात 239 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 123 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
हा तर शिक्षकांवर दाखविलेला अविश्वास..
Image
शिवसेना आमच्यासोबत येत नसेल, तर मी राष्ट्रवादीला आमंत्रण देतो \\ शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक \\ लातुर 162 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 102 नवीन बाधित
Image
महाराष्ट्राला आणखी एक केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता ।। राज्यात सुधारित कृषी कायदा लागू करणार नाही, महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा उघड ।। रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का ।। आज लातूर जिल्ह्यात 217 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 206 पॉझिटिव्ह रुग्ण
Image
शिक्षकांनी दर आठवड्याला ऑनलाइन वर्गाचा आढावा देणे बंधनकारक
Image