शिवशाही, मुगलशाहीसह देशाच्या भक्कम इतिहासाचे साक्षीदार असलेले महाराष्ट्रासह देशातील किल्ले देशाच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यातच नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी लांब पसरलेली आहे.या तटबंदीत ११४ बुरुज आहेत्.महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय.
उस्मानाबाद पासून ४६ कि.मी. अंतरावर असलेले नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच कि.मी.घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणा-या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग राक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो. तीन – चारशे वर्षापूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते. याचा हा सबळ पुरावाच आहे. पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणा-या पाहण्याचे विहंगमदृश्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात.
नळदुर्ग हा किल्ला तत्कालीन कालखंडात एक अभेद्य, बळकट दुर्ग म्हणून ओळखला जात होता. कणखरतेबरोबरच सौंदर्याच्या नजाकतीची नाजूक बाजूही या दुर्गाने तितकीच समर्थपणे सांभळली होती. आपल्या विविध दुर्गस्थापत्याच्या कलाकुसरीने पर्यटकांना अचंबित व मोहीत करणारा हा दुर्ग प्रत्येक भटक्याने अगदी सहकुटुंब पाहावा असाच आहे.
महाराष्ट्रात असणा-या सर्वोत्कृष्ट भुईकोट किल्ल्यांच्या यादीत नळदुर्गाचं नाव हे अग्रस्थानी घ्यावं लागतं. आपल्या महाराष्ट्रात अभेद्य व आवर्जून पाहावे असे बरेच भुईकोट किल्ले आहेत. दौलताबादचा देवगिरी परांडा, सोलापूरचा भुईकोट, अहमदनगरचा भुईकोट असो. हे सर्व किल्ले अभेद्य व भक्कम तर आहेतच पण त्याहीपेक्षा विशिष्ट अशा दुर्ग स्थापत्यशास्त्राने नटलेले आहेत. या स्थापत्यशास्त्राला सौंदर्याच्या नजाकततेची जोड लाभली आहे ती नळदुर्गाच्या प्रचंड बाहुपाशात. नळदुर्गामध्ये असलेला ‘पाणीमहाल’ हे या सौंदर्याचे मूर्तिमंत शिल्प. म्हणूनच सौंदर्याच्या मोजमापामध्ये नळदुर्ग इतर भुईकोट किल्ल्यांपेक्षा वेगळा ठरतो ते या पाणीमहालाच्या निर्मितीमुळेच!केवळ पाणीमहालच नव्हे तर तब्बल तीन किलोमीटर एवढी तटबंदी असलेल्या आणि एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ११४ बुरुजांनी सजलेल्या या नळदुर्गात पाहण्यासाठी बरेच काही आहे. म्हणूनच अनेक दुर्गप्रेमींची, अभ्यासकांची पावलं ही या नळदुर्गाकडे वळत असतात.
किल्ल्यात जाण्यासाठी आपल्याला तीन भव्य प्रवेशद्वार पार करून जावं लागतं. आत शिरताक्षणी आपण पहारेक-यांच्या देवड्यांसमोर येतो. आत आल्यानंतर आपल्याला जाणवतो तो या नळदुर्गाचा सारा काही भारदस्त आणि अवाढव्यपणा! दोन प्रचंड बुरुजांमधील प्रवेशद्वार असो, दुहेरी तटबंदी असो, पहारेक-यांच्या देवड्या असो. या सर्वावर भारदस्तपणाची छाप आपल्याला सतत जाणवत राहते.उस्मानाबाद जिल्हय़ातील तुळजापूर – हैदराबाद या रस्त्यावर हा भुईकोट ‘नळदुर्ग’ या नावाच्या गावातच वसलेला आहे. एका दिवसांत जरी हा किल्ला पाहून होत असला तरी एकूण अंतराचा हिशेब करून एखाद्या मुक्कामाची तयारी आखूनच हा बेत नक्की करायचा. देवड्यांसमोरच्या अंबारखान्याच्या इमारतीची तीच गोष्ट! या इमारतीच्या शेजारीच पडलेल्या तीन तोफा मात्र आपल्याला थांबवतात. या तीनपैकी सर्वात जास्त लांबीची तोफ पाहून आपल्या आश्चर्याला पारावर उरत नाही.
हे सर्व पाहातच आपली पाणीमहालाच्या दिशेने वाटचाल सुरू असते. यादरम्यान जामा मस्जिद व किल्ल्यात वास्तव्य करून राहणा-या काही लोकांची घरंसुद्धा दिसतात. हे पाहत पुढे आलो की डाव्या बाजूला बारदरी नावाची इमारत लागते. या इमारतीमध्ये इंग्रज अधिकारी कर्नल मेडोज टेलर हा वास्तव्य करून राहत होता. तो तिथे का राहत होता ते या इमारतीत आल्यानंतर कळतं. कारण या वास्तुत आल्यानंतर आपल्याला जे काही दिसतं ते केवळ अवर्णनीय असतं. या इमारतीला खेटूनच असणा-या बोरी नदीच्या पाण्याने भरलेल्या पात्राचं व त्याच्याच पुढे असणा-या बंधा-याचे अप्रतिम दृश्य या ठिकाणाहून दिसतं. इतका सुंदर नजारा की, हे पाणी पाहून हा भुईकोट वाटण्याऐवजी जलदुर्गच वाटू लागतो. समोर दिसणा-या बंधा-याच्या पोटातच पाणीमहाल दडलेला आहे. तो मात्र आता खुणवायला लागतो.
पाणीमहाल पाहण्यापूर्वी या बोरी नदीची भौगोलिक माहिती जाणून घेतली की या महाल बांधणा-याचं करावं तितकं कौतुक थोडंच वाटतं. आणि आपल्या नजरेत या वास्तूचं सौंदर्य कैकपटींनी वाढू लागतं. नळदुर्ग या किल्ल्याला संरक्षक म्हणून एक जोडदुर्ग बांधण्यात आला. त्याचे नाव ‘रणमंडळ’. हा दुर्ग बंधा-यावरून पलिकडे स्पष्टपणे दिसतो. या रणमंडळाच्या पलीकडे बोरी नदीचं मूळ पात्र आहे. त्यामुळे या रणमंडळाला आणि नळदुर्गाला संरक्षक खंदक हवा म्हणून बोरी नदीचे मूळ पात्र कायम ठेवून तिच्या प्रवाहाचा काही भाग हा या दोन दुर्गामध्ये वळवण्यात आला. त्यामुळे खंदकही झाला आणि नदीचं पाणीही त्यात आलं व याच्याच पुढे या दोन दुर्गाना जोडणारा बंधारादेखील बांधण्यात आला. १७४ मी. लांब, अडीच ते १४ मी रूंद व १९ मीटर उंच हे बंधा-याचं मोजमाप. याच बंधा-याच्या आत काही पाय-या उतरून गेलो की मग समोर येतो तो नळदुर्गचा सौंदर्यसार.. पाणीमहाल! आतमध्ये बांधलेल्या या कलाकृतीसमोर आपले शब्दही फिके पडतात. कारण या पाणीमहालाला पाण्याचा कुठेही स्पर्श होत नाही. या महालाच्या एका बाजूला पाणी अडवलेली भिंत तर दुस-या बाजूला व्हरांडा ऊर्फ गवाक्ष. या महालात दोन दालनं असून यातलं पहिलं बैठकीचं तर दुसरं सौंदर्याने भरलेलं. या दोघांमध्ये कारंजं उभं आहे.

या सर्वाच्या डावीकडे स्नानगृह व शौचगृह आहे. या सा-या वास्तुंवर नक्षीदार बारीक कलाकृती कोरलेली आहे. सर्वात शेवटी नऊ गवाक्षांचा सज्जा आपल्याला दिसतो. ही झाली पाणीमहालाची मांडणी. पावसाळ्यात ही बोरी नदी भरून वाहते तेव्हा हा बंधारादेखील ओसंडून नर-मादी अशा नावांच्या धबधब्याच्या रूपाने वाहू लागतो. म्हणजेच नर-मादी यांच्यातून पडणारं पाणी हे पाणीमहालासमोर व्हरांड्यात पाण्याचा एक झिरझिरीत पडदा घेऊन खाली पडताना दिसतं. गवाक्षासमोर पडदा होऊन पडणारं पाणी हे महालातून पाहण्यासारखं दुसरं सुख नाही. हा सोहळा अक्षरश: भान हरखून ठेवणारा असतो. पाणीमहालातून पडणारं हे पाण्याचं सौंदर्य पाहण्यासाठी मात्र आपल्याला पावसाळ्याच्या उत्तरार्धातच यावं लागतं. तेव्हाच आपल्याला पाण्याचा नेत्रदीपक आविष्कार पाहायला मिळतो. या अप्रतिम पाणीमहाल निर्मात्याचं नाव आहे मीर इमाद्दीन. हा अवलीया केवळ पाणीमहालाची निर्मिती करून थांबला नाही तर या आरसपाणी सौंदर्याचं अचूक वर्णन करणारा शिलालेखही या महालात लिहून मोकळा झाला. त्याचा मराठी अनुवाद असा.. ‘‘या महालात मित्रत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास डोळे दिपून जातील आणि शत्रुत्वाच्या दृष्टीने पाहिल्यास अंधारी येईल.’’ खरोखर या वाक्याची तंतोतंत प्रचिती आपल्याला एव्हाना आलेलीही असते. खरं म्हणजे पाणीमहाल तर हे या नळदुर्गाचं हृदयच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या पाणीमहालाच्या सैंदर्यावर भुलुन कर्नल मेडोज टेलर म्हणतो की, ‘‘मी आजपर्यंत पाहिलेल्या अनेक स्थळांत नळदुर्गाचा किल्ला ही अतिशय आकर्षक जागा आहे. नळदुर्गात अनेक गोष्टी आजही सुस्थितीत आहेत. विशेषत: इथले बुरूज काही गोलाकार, षट्कोनी, अष्टकोनी आकार घेऊन मोहीत करताना दिसतात. यातले दोन बुरूज तर दखल घेण्यासारखेच आहे. पहिला म्हणजे नऊ पाकळ्यांचा बुरूज म्हणजेच नवबुरूज. हा बुरूज आतून दिसत नाही, पण तुळजापूर-हैदराबाद रस्त्यावर उभं राहिलो की मग या बुरुजाविषयी काय म्हणावं ते सुचत नाही. नऊ पाकळ्यांचा आकार क्वचितच आपण बुरुजांमध्ये पाहिला असू. या बुरुजाएवढाच सुंदर बुरूज म्हणजेच उफळी बुरूज. या बुरुजावर जाण्यासाठी तब्बल सत्तर पाय-या वर चढून जाव्या लागतात. यातच याची भव्यता आली. एवढय़ा उंचीवर हा बुरूज एकांडाच उभा आहे. नळदुर्ग किल्ल्यामधील ही सर्वात उंच जागा. हे दोन्हीही बुरूज प्रत्येक फिरस्त्याने न चुकवावे असेच आहेत.
एकंदरीतच नळदुर्ग हा किल्ला तत्कालीन कालखंडात एक अभेद्य, बळकट दुर्ग म्हणून ओळखला जात होता. कणखरतेबरोबरच सौंदर्याच्या नजाकतीची नाजूक बाजूही या दुर्गाने तितकीच समर्थपणे सांभळली होती. आपल्या विविध दुर्गस्थापत्याच्या कलाकुसरीने पर्यटकांना अचंबित व मोहीत करणारा हा दुर्ग प्रत्येक भटक्याने अगदी सहकुटुंब पाहावा असाच आहे. कारण नळदुर्ग ही केवळ वास्तु न राहता तो आपल्या सारख्यांसाठी झाला आहे एक नेत्रदीपक सौंदर्य ‘प्रासाद’.

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे निघाल्यावर सोलापूर पासुन ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे. या गावातच नळदुर्ग हा अप्रतिम बांधकामाचा हा अजोड किल्ला आहे.स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलतानांच्या ताब्यामध्ये होता. बहमनी राज्याची शकले उडाली व त्यातुन ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैद्राबादच्या निजामाकडे सोपवली.नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी लांब पसरलेली आहे.या तटबंदीत ११४ बुरुज आहेत्.महाराष्ट्राचे गिरीदुर्ग, जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय.

कसे जाल : – नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे निघाल्यावर सोलापूर पासुन ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे. या गावातच नळदुर्ग हा अप्रतिम बांधकामाचा हा अजोड किल्ला आहे.