नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे गुजरातमध्ये केलं तेच ते दिल्लीचं करत आहेेत, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींवर केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्वाचा अजेंडा 1930 च्या दशकात हिटलरने राबवलेल्या नाझीवादाप्रमाणेच आहे. असं इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. याआधीही त्यांनी मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन घातक चूक केली आहे. मोदी यांनी पाकिस्तानला निवडणुकीत बळीचा बकरा केले होते, अशीही खान यांनी मोदींवर केली आहे.
दरम्यान, देशभरातून दिल्लीमध्ये झालेल्या प्रकरावरून सर्व लोक केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली सरकारला लक्ष्य करत आहेत.