मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत मोठा निर्णय जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला.
कोल्हापूर : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.राज्य शासनाने कॅबिनेटमध्ये जाहीर केलेल्या नऊ गोष्टींची पुर्तता कशी व कधी करणार हे समाजाला ९ ऑक्टोबर पर्यंत पटवून सांगावे, अन्यथा १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत घेण्यात आला. यापुढे आरक्षणाची लढाई ही एक मराठा लाख मराठा या बॅनर खालीच लढण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून परिषदेची सुरूवात करण्यात भाली. भरत पाटील यांनी स्वागत केले, पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक केले. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले, परिषदेत केलेले ठराव मुख्यमंत्री, राज्यपालांसह सर्व राज्यकर्त्यांना पाठवले जाणार आहेत. आम्हाला चर्चेला बोलावू नका, मात्र या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्या. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढाई कायम राहणार आहे.
गोलमेज परिषदहोते म्हटल्यावर मंगळवारीच राज्य शासनाने मराठा समाजासाठी विविध योजनांची घोषणा केली. आंदोलनात मृत्यमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना नोकरी, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे, आण्णासाहेब पाटील महामंडळास आर्थिक तरतुद आदी घोषणा यापुर्वीही शासनाने केल्या मात्र त्याची पुर्तता केली नाही. आता आम्ही अल्टीमेटम देतो, ९ ऑक्टोबरपर्यंत कॅबिनेटने घोषणा केलेल्या गोष्टींची समाधानकारक पुर्तता केली नाहीतर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद केला जाईल. घोषणांनी परिसर दणाणला परिषदेच्या सुरूवातीपासूनच विविध संघटनांचे पदाधिकारी घोषणा देत होते. एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवाजी, आरक्षण आमचं हक्काचे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मराठा समाज गोलमेज परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे -
- मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
- मराठा समाजातील मुलामुलींना चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
- केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
- महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
- सारथी संस्थेला १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.
- राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
- मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
- मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
- स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.
- अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
- राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
- कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
- राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद करावी
------------------------------------------------------------
पाच हजाराची लाच स्वीकारताना महिला सरपंच पतीला अटक
आरोपी राजकुमार महालिंग शेटे वय ३५ वर्षे , व्यवसाय- व्यापार , ( ग्रामपंचायत तिर्थवाडी सरपंच यांचे पती ) रा . तिर्थवाडी ता . चाकुर जि . लातुर यांनी ५००० / -रुपयांची लाच स्विकारली म्हणुन गुन्हा दाखल . यातील तकारदार यांचे एम.आर.इ.जी.एस. अंतर्गत तकारदार यांनी त्यांच्या शेतीमध्ये सिंचन विहीर मंजुर करण्यासाठी ग्रामपंचायत तिर्थवाडी यांचेकडे प्रस्ताव दाखल केला होता . त्याप्रमाने साहेबांना सांगुन सिवन विहीर मंजुर करून घेतो म्हणुन सरपंच मनिषा शेटे यांचे पती राजकुमार शेट्टे हे ७,००० / -रुपये लाचेची मागणी करत असल्या बाबतची तकार दिनांक २३ / ० ९ / २०२० रोजी प्राप्त झाली होती . तकारदार यांचे तकारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , लातूर यांच्याकडून दिनांक २३ / ० ९ / २०२० रोजी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता , आरोपी राजकुमार महालिंग शेटे यानी तकारदार यांचे एम.आर.इ.जी.एस. अंतर्गत त्यांच्या शेतीमध्ये साहेबांना सांगुन सिंचन विहीर मंजर करून देण्याच्या कामात मदत करतो म्हणुन ७,००० / -रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५,००० / -रुपये आता व उर्वरीत २,००० / -रूपये नंतर घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले . आरोपी राजकुमार महालिंग शेटे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांना दिनांक २३ / ० ९ / २०२० रोजी विजय जनरल अॅन्ड गिफ्ट सेंटर , चाकुर जि . लातुर येथे पाठविले असता आरोपी राजकुमार शेट्टे यांनी ५,००० / -रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम १४.४ ९ वाजता पंचासमक्ष विजय जनरल अॅन्ड गिफ्ट सेंटर , चाकुर जि , लातुर येथे स्वतः स्विकारली आहे . म्हणुन त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे . म्हणून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन चाकुर येथे कलम ७ अ , ला.प्र.का. अधिनियम १ ९ ८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे . गुन्हाचा तपास पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , लातूर हे करीत आहेत . सदरची सापळा कार्यवाही श्रीमती कल्पना बारवकर , पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नांदेड परिक्षेत्र , नांदेड , श्रीमती अर्चना पाटील , अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नांदेड परिक्षेत्र , नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक माणीक बेद्रे . पोलीस निरीक्षक कुमार दराडे , पोह संजय पस्तापुरे , लक्ष्मीकांत देशमुख , पोना / चंद्रकांत डांगे , मोहन सुरवसे , मपोना . शिवकांता शेळके , संतोष गिरी , शिवशंकर कच्छवे , अमोल शिंदे , संदीप जाधव , दिपक कलवले , मपोशि रुपाली भोसले , चापोना / राजु महाजन यांनी पार पाडली आहे .
----------------------------------------------------------------------------
लातूर जिल्हा :
उस्मानाबाद जिल्हा :
आज प्राप्त झालेल्या 291 RTPCR अहवालांपैकी 96 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 169 अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. 26 अहवाल इनकन्क्लूजीव आढळून आले आहेत. तसेच आज 618 Rapid Antigen Test पैकी 167 रुग्ण पॉझिटिव्ह तर 451 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. RTPCR आणि Rapid Antigen Test दोन्ही मिळून 263 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या एकूण बाधितांची संख्या 10855 झाली आहे तर 7759 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत आणि 2777 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकड़ा 319 वर पोहोचला आहे.